मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एका टॉवेलसाठी मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; भंडाऱ्यातील घटना

एका टॉवेलसाठी मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; भंडाऱ्यातील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2024 04:48 PM IST

Mother and Daughter Died : भंडाऱ्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाल्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

भंडाऱ्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू
भंडाऱ्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. मुलगी व आई कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेल्या होत्या. कपडे धुताना हातातील टॉवेल निसटून पाण्यात वाहून जाऊ लागला. ते पाहून मुलगी पाण्यात उतरली. टॉवेल घेण्यासाठी मुलगी २५ ते ३० फूट पुढे पाण्यात गेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. मुलीला बुडताना पाहून आई तिला वाचवण्यासाठी धावली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडली.

ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बोथली /धर्मापुरी येथे घडली. सुषमा विजय मेश्राम (वय ४५) आणि दिव्या विजय मेश्राम (वय १६) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. धर्मापुरी गावाच्या शेजारीत नाला वाहत असून गावातील अनेक महिला कपडे धुन्यासाठी नाल्यावर जात असतात. तशाच या मायलेकी नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी सकाळी याठिकाणी गेल्या होत्या. मात्र त्या घरी परतल्याच नाहीत.

दिव्या कपडे धुताना अचानक तिच्या हातून टॉवेल सुटला. हा टॉवेलच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. एका टॉवेलमध्ये मायलेकींना आपला जीव गमवावा लागला. दिव्याला पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे ती बुडाली. दिव्या बुडत असल्याचं पाहून आईसुद्धा धावली पण खोल पाणी आणि पाण्यावर कैंदारळाचे वेल असल्याने त्या अडकल्या व दोघींचाही नाल्यात बुडून अंत झाला.

IPL_Entry_Point

विभाग