Bhandara: परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhandara: परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार!

Bhandara: परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार!

Dec 26, 2024 08:44 PM IST

Bhandara Government Nursing College: भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी प्राचार्याला चोप दिला. प्राचार्यावर विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी
परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी

Bhandara News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी जाब विचारून कॉलेजच्या प्राचार्याला चांगलाच चोप दिला. हा प्रकार भंडाऱ्यातील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये आज घडला.

भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये १०० हून अधिक विद्यार्थिनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. नुकतीच नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची परीक्षा झाली. या परिक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थीनींना पास करण्याचे आमिष दाखवत कॉलेजचे प्राचार्य किरण मुरकुट यांनी त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याबाबत विद्यार्थीनींनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. यानंतर संतप्त पालकांनी जाब विचारण्यासाठी कॉलेजमध्ये आज धडक दिली. मात्र, तिथे गेल्यानंतर प्राचार्य मुरकुट यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे संतापलेल्या पालकांनी प्राचार्याला चोप दिला.

यानंतर कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत भंडारा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी प्राचार्याची पालकांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी विद्यार्थिनीचे जबाब नोंदवून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेने कॉलेजमध्ये खळबळ माजली आहे.

उत्तर प्रदेशात राज्य महिला आयोगाकडून महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाच्या प्राधान्यक्रमावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले. महिलांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, यात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करणे बंधनकारक आहे.अधिकारी व पोलिसांनी महिलांच्या समस्येचे तातडीने निदान करून घ्यावे. यावेळी एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा गुन्हा दाखल न केल्याची तक्रार केली. त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर