मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagatsingh Koshyari: मराठी शिका! राज्यपाल कोश्यारींनी गुजरातींना दिला सल्ला

Bhagatsingh Koshyari: मराठी शिका! राज्यपाल कोश्यारींनी गुजरातींना दिला सल्ला

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 03, 2022 10:44 AM IST

Bhagatsingh Koshyari: राज्यपालांनी गुजराती आणि राजस्थानी मुंबईत नसते तर इथे पैसाच दिसला नसता असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी गुजरातींना दिलेल्या या सल्ल्याची चर्चा होत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (फोटो - दीपक साळवी)

Bhagatsingh Koshyari: देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याने वादात अडकलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी त्याबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती नागरिकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला आहे. राज्यपालांनी गुजराती आणि राजस्थानी मुंबईत नसते तर इथे पैसाच दिसला नसता असं वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळे राज्यात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, राज्यपालांचा हा सल्ला गुजराती लोक मनावर घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राज्यपाल म्हणाले की, देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली ओळख जपायला हवी. त्याचबरोबर स्थानिक संस्कृतीशी एकरुप होण्याची गरज आहे. भारत हा एका सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेनं नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा याबाबत वेगळी ओळख आहे. तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे.

महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करायला हवा. मी स्वत: महाराष्ट्रात आल्यावर ५ ते ६ महिन्यात चांगली मराठी शिकलो असंही राज्यपालांनी म्हटलं आहे. मंगळवारी राजभवानात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा सल्ला दिला आहे. मुंबईतील गुजराती सांस्कृतिक फोरम सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेकडून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या