मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagatsingh Koshyari: भगतसिंह कोश्यारी नरमले! प्रकरण चिघळताच केला भलामोठा खुलासा

Bhagatsingh Koshyari: भगतसिंह कोश्यारी नरमले! प्रकरण चिघळताच केला भलामोठा खुलासा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 30, 2022 12:40 PM IST

Bhagat Singh Koshyari explanation on Mumbai Comment: मुंबई व महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्यावरून वाद उफाळताच भगतसिंह कोश्यारी यांनी यावर तातडीनं सविस्तर खुलासा केला आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari clarification on mumbai controversy: मुंबई व महाराष्ट्राबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानावरून वाद निर्माण होताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीनं भलामोठा खुलासा केला आहे. 'नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.  'काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केलं, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच, शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. 

मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभं केलं. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळं मराठी माणसाचं योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचं कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

'राजकीय पक्षांनी कारण नसताना वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचंच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचं योगदान अधिक आहे, असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग