Best Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप-best bus catches fire in mumbais ghatkopar video goes viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Best Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप

Best Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप

Sep 30, 2024 06:53 PM IST

Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील घाटकोपर परिसरात भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : घाटकोपर परिसरात बेस्टच्या बसला आग
मुंबई : घाटकोपर परिसरात बेस्टच्या बसला आग

BEST Bus Catches Fire In Mumbai: मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, बस पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी बसला आग लागली. त्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे एलबीएस रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमातर्फे ४८३ मार्गांवर सुमारे ३,७०० बसेस चालविल्या जातात आणि मुंबई, नवी मुंबई आणि विस्तारित उपनगरांमध्ये दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशी बेस्टच्या बसमधून प्रवास करतात.

Whats_app_banner
विभाग