थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...-bengaluru womans body cut into 20 pieces found stored in refrigerator ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...

थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...

Sep 21, 2024 09:45 PM IST

Bengaluru Women Murder News: बंगळुरूमध्ये एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे प्रकार समोर आला आहे.

महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले
महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले (HT_PRINT)

Bengaluru Women Body Cut into 20 Pieces: बंगळुरूमध्ये गुरुवारी एका २९ वर्षीय महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. व्यालिकावल परिसरातील वीराणा भवनाजवळ हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महालक्ष्मी असे मृत महिलेचे नाव असून या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.

मृत महिलेच्या मृतदेहाला अळ्या आणि किडे लागले होते. यामुळे गेल्या चार पाच दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट टीम आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त एन. सतीश कुमार यांनी सांगितले की, व्यालिकावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात महिलेची केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. ४-५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मृत महिला कर्नाटकात स्थायिक झाली असली तरी ती मूळची दुसऱ्या राज्यातील आहे. ही महिला पतीपासून वेगळी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी मल्लेश्वरम येथे राहत होती आणि एका मॉलमध्ये काम करत होती. तर, तिचा पती शहरापासून दूर असलेल्या आश्रमात काम करत होता. घटनेची माहिती मिळताच तोही घटनास्थळी आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

श्रद्धा वाळकरच्या हत्येची पुनरावृत्ती

हे प्रकरण २०२२ मध्ये दिल्लीत २७ वर्षीय श्रद्धा वाळकरच्या हत्येशी विदारक साम्य दर्शवते, जिथे तिच्या प्रियकराने तिची हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते.

चेन्नई: रस्त्यावर सूटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

चेन्नईतील थोरईपक्कम येथे गुरुवारी एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह रस्त्यावरील सूटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरूवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एका पादचाऱ्याकडून रस्त्यावर रक्ताचे डाग पडलेली सूटकेस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एम. मणिकंदन नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Whats_app_banner
विभाग