Viral news : सध्या ऑनलाइन शॉपिंगच जमाना आहे. कपडे, ईलेक्ट्रॉनिक वस्तु ते किराणा सामान सुद्धा आज ऑनलाइन मागवण्याचे मोठे प्रमाण आहे. मात्र, या ऑनलाइन शॉपिंगमुळे एक व्यक्ति चांगलाच भडकला आहे. त्याने थेट स्वीगी आणि इस्टामार्टविरोधात पोस्ट लिहून त्यांना झापलं आहे. त्याच रागावण्याचं कारणही वेगळं आहे. त्या व्यक्तीला ऑनलाइन शॉपिंगदरम्यान मोफत टोमॅटो मिळाल्याने हा ग्राहक संतापला होता. चंद्रा रामानुजन असे शॉपिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा बेंगळुरूयेथील एक आहे.
चंद्रा रामानुजन हा बेंगळुरूमध्ये प्रॉडक्ट डिझायनर आहेत. त्याने स्विगी इन्स्टामार्टयेथून काही वस्तु खरेदी केल्या होत्या. या खरेदीवर त्याला मोफत टोमॅटो मिळाले. त्याला हे टोमॅटो नको होते. तसेच त्याच्या उपयोगाची नसलेली ही विनामूल्य वस्तू त्याला त्याच्या शॉपिंगच्या यादीतून काढून टाकायची होती. मात्र, त्याला ते करता आले नाही. यामुळे चंद्रा रामानुजन हा चांगलाच भडकला. त्याने कंपनीच्या या गोष्टीला डार्क पॅटर्न असं म्हटलं. याबाबत त्याने विरोध करत एक्सवर पोस्ट लिहिली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे. चंद्रा रामानुजन यांनी एक्सवर अर्धा किलो टोमॅटो मिळाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबतच्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, स्विगी इन्स्टामार्टची हे अतिशय खराब अॅप्लिकेशन आहेत. जर एक वस्तू मला हवी नसतांना ती माझ्या शॉपिंगच्या यादीत जोडली जात असेल तर ते चुकीचे आहे. ग्राहकांना जबरदस्तीने वस्तु विकण्याचा कंपनीचा हेतु चुकीचा आहे. मला टोमॅटो नको होते. त्यामुळे मी त्यांना माझ्या यादीतून काढून टाकत होतो. पण मी ते काढू शकलो नाही. रामानुजन ने पुढे लिहिलं की, 'बरं, मी यासाठी पैसे देखील देत नाहीये. हा प्रकार म्हणजे माझ्या खरेदी यादीत कंपनीने डोकावण्याचा प्रकार केला आहे. हे माझ्या इच्छेविरोधात झालं आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे.
रामानुजन यांच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सनी देखील कमेन्ट केल्या आहेत. अनेक नेटकरी त्याच्या पोस्ट वर व्यक्त झाले आहेत. अनेकांनी त्यांच्याशी सहमतीही दर्शवली आहे. ही पोस्ट आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. एका युजरने लिहिले की, 'मी रामनुजन यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. टोमॅटो विनामूल्य आहेत, तरीही त्याला डार्क पॅटर्न म्हटले जात आहे? मात्र ते काढून टाकता येणार नाही, हे मी समजू शकतो. त्याला उत्तर देताना रामानुजन यांनी लिहिले की, मला जे नको आहे, तेही दिले जात आहे, हा डार्क पॅटर्न आहे. जरी ते फुकट असले तरीही. "प्रॉब्लेम असा नाही की मला टोमॅटो मिळताय. समस्या ही आहे की ई-कॉमर्सकडून ग्राहकांच्या अपेक्षांचा आदर केला जात नाही. कंपनीकडून मला काय हवंय आणि काय नाही त्यावर माझं नियंत्रण असायला हवं.
सोशल मीडियावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ग्राहकांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असावा. तुम्ही फुकटच्या गोष्टी देत आहात, ठीक आहे. पण ग्राहकाला ते घ्यायचे की नाही हे ठरवू द्या. त्यांनी स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांवर टीका केली आणि लिहिले की, आम्हाला असा ब्रँड हवा आहे जो आपला नफा कमावेल, परंतु ग्राहकांना प्राधान्य देईल. आणखी एका व्यक्तीने रामानुजन यांना सल्ला दिला की त्यांनी हे टोमॅटो ज्यांना गरज आहेत, त्यांना द्यावेत.
डार्क पॅटर्न ही वेबसाइट्स आणि अॅप्सद्वारे डिझाइन ट्रिक आहे. यामध्ये लोकांना अतिरिक्त खरेदी, एखाद्या गोष्टीसाठी साइनअप, वैयक्तिक माहिती देणे अशा गोष्टी फॉलो कराव्या लागतात. या डार्क पॅटर्नमध्ये ग्राहकांना पर्याय दिला जात नाही. तसेच सब्सक्रिप्शन सोडणे, अतिरिक्त पैसे खर्च करणे किंवा प्रायव्हसीचा पर्याय यात नसतो.
संबंधित बातम्या