Arunachal Result : लोकसभा निकालापूर्वी अरुणाचलमध्ये फडकला भगवा, भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Arunachal Result : लोकसभा निकालापूर्वी अरुणाचलमध्ये फडकला भगवा, भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे

Arunachal Result : लोकसभा निकालापूर्वी अरुणाचलमध्ये फडकला भगवा, भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे

Updated Jun 02, 2024 11:09 AM IST

Arunachal Pradesh assembly Election Result : अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. अरुणाचल प्रदेशात भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करतांना दिसत आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. अरुणाचल प्रदेशात भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करतांना दिसत आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. अरुणाचल प्रदेशात भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करतांना दिसत आहे. (PTI)

Arunachal Pradesh assembly Election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्या पूर्वी एक्जिट पोलचे आकडे जाहीर झाले आहे. यात मोदी सरकार पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवन्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशात भाजप चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. आज अरुणाचल विधानसभेसाठी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीत आतापर्यंत ३५ जागांची माहिती पुढे आली असून यातील १० जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. तर १९ जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे. याशिवाय तीन जागा एनपीपी आणि इतर आघाडीवर आहेत.

Mumbai water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात गुरुवार, शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडल्यावर एक्जिट पोल जाहीर झाले. अनेक सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले होते. अरुणाचल प्रदेशातील आकडेवारीही समोर आली आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला ४४ ते ५१ जागा मिळू शकतात. तर एनपीपीला २ ते ६ जागा आणि काँग्रेसला फक्त एक ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना दोन ते सहा जागा मिळू शकतात.

Pune Porsche Car Accident : 'मी मद्यधुंद अवस्थेत होतो; मला काही आठवत नाही'; पोलिस तपासात आरोपी मुलाचा व आईचा असहकार

विधानसभेच्या ६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिलला मतदान झाले. येथे ८२.९५ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. भाजपने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ १९ जागा लढवल्या. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांनीही अरुणाचल प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले आहेत.

Maharashtra Weather Update: विदर्भ तापलेलाच! नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात हीट वेव्ह! ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

भाजपने यापूर्वीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. बोमडिला, चौखम, ह्युलियांग, इटानगर, मुक्तो, रोइंग, सागली, तळी, तळीहा आणि झिरो-हापोली येथे भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत.

अरुणाचल प्रदेशातील प्रमुख चेहऱ्यांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांचा समावेश आहे. इतर प्रमुख उमेदवारांमध्ये बियुराम वाहगे (भाजप), निनॉन्ग एरिंग (भाजप), कारिखो क्री (एनपीपी), पानी तारम (भाजप), कुमार वाली (काँग्रेस), कमलुंग मोसांग (भाजप), वांगकी लोवांग (भाजप) आणि जम्पा थिरनाली कुमखाप (भाजप) यांचा समावेश आहे. काँग्रेस) यांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशात भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या. जनता दल (युनायटेड)ला सात, एनपीपीला पाच, काँग्रेसला चार, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलला (पीपीए) एक जागा मिळाली. दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या