मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बीड येथील वंजारी समाजाचा अजब ठराव; मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय, वातावरण पेटले

बीड येथील वंजारी समाजाचा अजब ठराव; मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय, वातावरण पेटले

May 27, 2024 02:58 PM IST

Beed News: बीड येथील वंजारी समाजाने मराठा समाजाच्या दुकानांतून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला.

बीड येथील वंजारी समाजाने मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय घेतला.
बीड येथील वंजारी समाजाने मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Politics: बीड जिल्ह्यातील वंजारी समाजबहुल दोन गावांनी मराठा समाजाच्या दुकानांतून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा ठराव केला. मात्र, या ठरावामुळे बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, नेमक कशामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला? नेमकं कोण विष कालवत आहे? या अुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, १७ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता वंजारी समाजाची मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर बैठक झाली. या बैठकीत वंजारी समाजातील लोकांनी अजब ठराव केला, ज्यात मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही, मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचे नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचे नाही, मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेलवर जायचे नाही, जो कोणी हा नियम मोडेल, त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, या ठरावामुळे वंजारी आणि मराठा समाजात वाद पेटण्याची शक्यता आहे.  बीडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीडचे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत.

मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

वंजारी समाजाच्या ठरावानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली. असे व्हायला नाही पाहिजे, कारण शेवटी आपण गाव- खेड्यात एकत्र राहतो. आम्ही कधीच जातीवाद केला नाही. आम्ही आधी कोणाला बोललोच नाही. गैरसमज झाला असेल तर संवादातून सोडवावा. गोरगरीब मराठ्यांसोबत तुम्ही सत्तेत आल्यानंतर असे वागणार, तुम्ही गोरगरीब मराठ्यांशी असे वागणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन

पुढे मनोज जरांगे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना माझे आवाहन आहे की, शांततेत राहा, आता वेळ निघून गेलीय. यापूर्वी देखील मराठा शांत राहिला आहे. लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू. अगोदर कोणाचे नाव घेतले नाही, त्यावेळेला नाव घेऊ, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग