Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी मस्साजोग येथे मोर्चा काढत आंदोलन देखील करण्यात आले आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड हे मुख्य आरोपी फरार असून ते आज पोलीसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे. रविवारी सीआयडीच्या पथकाने आरोपींची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सीआयडीने रविवारी वाल्मिक कराड याच्या पत्नीसह अन्य चार महिलांची देखील चौकशी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे पथक गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा सीडीआय तपास करीत आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड यांची रविवारी चौकशी करण्यात अलायी. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं.
दरम्यान सीआयडीने वाल्मिक कराडसहीत या हत्याकांड प्रकरणातील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवली. कराडकडे पासपोर्टनसल्याने तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे वाल्मीक कराड हा शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीआयडीच्या पथकाने आरोपींच्या स्कार्पिओमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल जप्त केले आहेत. त्यांची तपासणी केली जात आहे. यातून घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सीआयडीचे ९ पथके बीडमध्ये असून या प्रकरणी तपास केला जात आहे. बीडमधील खंडणी अन् सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध हे पथक घेत आहे. सीआयडीने या तपासामध्ये आरोपींच्या पासपोर्टविषयीही कारवाई केली आहे. केवळ राज्यच नाही तर देशभरामध्ये या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
संबंधित बातम्या