Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून मारलं, नंतर अपहरण करून संपवलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून मारलं, नंतर अपहरण करून संपवलं

Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून मारलं, नंतर अपहरण करून संपवलं

Dec 10, 2024 12:49 PM IST

Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej : पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या केल्याची घटना ताजी असतांना बीडमध्ये देखील एका सरपंचांची याच पद्धतीने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये सरपंचांची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून केली माराहण, नंतर अपहरण करत संपवलं
बीडमध्ये सरपंचांची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून केली माराहण, नंतर अपहरण करत संपवलं

Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej : राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची घटना ताजी असतांना बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ९) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. संतोष देशमुख असं हत्या झालेल्या सरपंचाचं नाव असून त्यांचं येथील टोलनाक्याजवळून अपहरण झालं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हे त्यांच्या कारमधून त्यांचा मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासोबत मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव टोलनाका येथे त्यांची कार काही अज्ञात व्यक्तिंनी अडवली. त्यांना त्यांच्या कारमधून उतरवत आरोपींनी बेदम मारहाण केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर संतोष देशमुख यांना आरोपींनी त्यांच्या कारमध्ये बसवत केजच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी देशमुख यांच्या सोबत आलेल्या मामेभावाने पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी तातडीने या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केजकडे नेलं असल्याचे मामेभाऊ शिवरज देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास पथके केजच्या दिशेने रवाना केली. मात्र, देशमुख यांचा मृतदेह हा थोड्या वेळाने दैठणा गावाच्या रस्त्यावर आढळला.

पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. केज पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संतोष देशमुख यांनी त्यांचा गावात अनेक विकासकामे राबवली होती. यामुळे ते तालुक्यात परिचित होते. त्यांनी केलेल्या कामामुळे मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांच्या या प्रकारच्या हत्येमुळे तालुक्यासाह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर