Beed Rape Case : बीड जिल्ह्यातील केज येथूनएक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर ते व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर अत्याचारानंतर नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. केज परिसरातील घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकाराची वाच्याता कुठे केल्यास तिचे सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तरुणीला दिली. त्यानंतर तिला वारंवार ब्लॅकमेल करत तिच्यावर १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी मुलीने हे कोणालाच सांगितले नाही. मात्र एके दिवशी आरोपीने सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवले. आई-वडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारला असता तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात याबाबत पीडित तरुणीची तक्रार नोंदवण्यात आली. केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आरोपीला अटक केली. त्याला १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ महिन्यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये केज येथील नीट परीक्षेची तयारी करत असलेली महाविद्यालयीन तरुणी लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. तिने लातूरला जायचं म्हणून तिला आपल्या चारचाकीत घेतले.
केजपासून पुढे ७० किमी अंतरावर रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवली व तिला एका रुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. हा प्रकार कोणाला सांगितल्यास हे सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई-वडीलासह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी देत होता. तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत त्याने त्यानंतरही १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केले.
आरोपी सूरज गुंड याने पीडित तरुणीला इन्स्टाग्रामवरची फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर त्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली व त्यातून ते एकमेकांशी चॅटिंग करत होते. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला लॉजवर नेले.