Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांकडून आयुष्य संपवण्याचे सत्र सुरूच, बीडमध्ये आणखी एकाची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांकडून आयुष्य संपवण्याचे सत्र सुरूच, बीडमध्ये आणखी एकाची आत्महत्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांकडून आयुष्य संपवण्याचे सत्र सुरूच, बीडमध्ये आणखी एकाची आत्महत्या

Jun 16, 2024 11:18 PM IST

pankaja munde : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. आज आणखी एका मुंडे समर्थकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. आतापर्यंत चार समर्थकांनी जीवन संपवले आहे.

आणखी  एका मुंडे समर्थकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
आणखी  एका मुंडे समर्थकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून लोकसभेच्या निकालानंतर बीड जिल्ह्यात मुंडे समर्थकांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. पंकजा मुंडेच्या ४ समर्थकांनी आपले जीवन संपवले आहे. या घटनांनी व्यतीत झालेल्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, कोणाही टोकाचे पाऊल उचलू नये. मात्र आत्महत्येचं सत्र अजूनही थांबले नसल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. आज आणखी एका मुंडे समर्थकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबातील एकाने पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना व आजच पंकजा मुंडे यांनी या कुटूंबाची भेट घेतली असताना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील त्यांच्या समर्थकाने आज आपली जीवन यात्रा संपवली. गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावआहे.

पंकजा मुंडे या लोकसभेच्या निकालानंतर आजपासून बीड जिल्ह्यातील आभार दौऱ्यावर आहेत. आज त्या आष्टी तालुक्यातील इंदेवाडी येथील तसेच डिघोळआंबा येथे होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्या जिल्हा दौऱ्यावर असून दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एक आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली होती. तुम्हाला माझी शपथ आहे,  जीवाचं बरं वाईट करु नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली होती. मात्र याचा कार्यकर्त्यांवर काहीच परिणाम होत नसून एकापाठोपाठ एक आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.

पंकजा मुंडे यांनी आज चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटूंबीयांचा आक्रोश पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी समर्थकांना आवाहन केले की, आता जीवन संपवू नका. तर मला लढण्यासाठी बळ द्या. हे प्रकार थांबले नाही तर मी राजकारण सोडून देईल. आगामी शंभर दिवसांत हे सगळे चित्र बदलून टाकू, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

 

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रावादी शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी त्यांचा पराभव करत १५ वर्षांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. बजरंग सोनवणे यांनी ६,५८५ मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर