मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bajrang Sonawane : बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात

Bajrang Sonawane : बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात

Jun 05, 2024 10:51 AM IST

Bajrang Sonawane car accident: बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला.
बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला.

Bajrang Sonawane car accident: बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचा तब्बल ७ हजार मतांनी पराभव करून जायंट किलर ठरलेले बजरंग सोनवणे हे त्यांच्या विजयानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांचा अपघात झाल्यावर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, गाडीतील सर्व जण सुखरूप असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ajit Pawar : 'कुठलंही अपयश अंतिम नसतं....'; पराभवानंतर अजित पवारांनी सोशल मिडियावर पोस्ट करून कार्यकर्त्यांना दिला धीर

राज्यात बीडची निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे व मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसल्याची विश्लेषयकांचे म्हणणे आहे. दरम्यान, बीड मध्ये देखील पंकजा मुंडे यांना या आंदोलनाचा फटका बसला. त्यांचे विरोधक बजरंग सोनवणे यांनी मुंडे यांचा ७ हजार मतांनी पराभव केला. दरम्यान, निवडणूक अधिकारी कडून विजयाचे पत्र घेतल्यावर बजरंग सोनवणे यांनी जोरदार जल्लोष केला. या नंतर बजरंग सोनावणे हे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

Samana Editorial : 'मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखला; ‘सामना’तून पीएम मोदींवर टीकास्त्र

बजरंग सोनवणे हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गाने अंतरवाली सराटी येथे जात होते. त्यांचा ताफा हा शहागड पुलाच्या बाजूला आला असताना ताफ्यातील एक कार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला येऊन जोरदार धडकली. यामुळे बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडीतील काही जण किरकोळ जखमी झाले. त्यांना जवळील दवाखान्यात उपचार करण्यात आले. यानंतर सोनवणे हे अंतरवली सराटी येथे गेले. त्यांनी मनोज जरांगे पाटील भेट घेत विजय साजरा केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सोनवणे यांना फायदा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक तापला होता. बीडमध्येही हा मुद्दा महत्वाचा होता. यामुळे मराठवाड्यात अनेक जागांवर भाजपला मोठा फटका बसला. बीडमध्ये झालेल्या अतिटतीच्या लढतीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४