Beed lok sabha election result : राज्यातील सर्वात रोहहर्षक व उत्कंठावर्धक लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात क्रिकेटमधील सुपर ओव्हारलाही लाजवेल असा थरार पाहायला मिळाला. आज मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये चुरस पाहायला मिळाली. कोण जिंकेल हे शेवटच्या फेरीपर्यंत सांगता येत नव्हते. शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांचा ७००० मतांनी पराभव झाला आहे.
दरम्यान शरद पवारांनी ट्विट करत बीज जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हणत महासंचालकांना परिस्थितीवर नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. पवार यांनी ट्विट केले आहे की, बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे.
एकीकडे देशभरातील निकाल दुपारीच स्पष्ट झाले होते मात्र बीडच्या निकालाने शेवटपर्यंट सस्पेन्स कायम ठेवला. विजयाचे पारडे कधी पंकजा मुंडे यांच्या कडे तर कधी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याकडे झुकत होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारत मुंडे यांना पराभूत केले.
२४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही आघाडी कमी-कमी होऊ लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले आहेत.
राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला असून सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर,राज्यात सर्वात हाय व्होल्टेज आणि जातीय रंग लागल्याने चर्चेत ठरलेली लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. बीडमध्ये पहिल्या फेरीपासूनच पंकजा मुंडे पिछाडलेल्या दिसून आले. पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी १३५९ मतांचे मताधिक्य घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर, तिसऱ्या फेरीतही सोनवणे आघाडीवर होते. मात्र,बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या बजरंग सोनवणे यांची आघाडी ३० व्या फेरीपर्यंत कायम राहिली.त्यानंतर पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंची आघाडी तोडून तब्बल ४३ हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी होऊन बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुडेंचा लीड कमी होऊन शेवटच्या काही फेरीत हे मताधिक्य केवळ ४०० मतांवर येऊन पोहोचलं होतं. त्यामुळे, राज्यात सर्वात थरारक आणि उमेदवारांच्या काळजाचे ठोके चुकवणारी ही लढत ठरली आहे. ३१ व्या फेरीत बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या म्हणजेच ३२ व्या मतमोजणीकडे सर्वांचे लागले होते. ३१ व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे ६८८ मतांनी आघाडीवर पोहोचले होते.
३१ व्या फेरीअखेर सोनावणे ६९८ मतांनी आघाडीवर होते. तर ३२ व्या अखेरच्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. आष्टी मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे.
संबंधित बातम्या