Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई-beed crime news police seized crores of rupees in beed one was taken into custody ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

May 05, 2024 12:52 PM IST

Beed Crime news : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम सापडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बीडमध्ये आज सकाळी इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी रुपयांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Beed Crime news : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ तारखेला होणार आहे. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम सापडण्याचे प्रकार वाढले आहे. बीड येथे देखील आज एका कारमध्ये तब्बल १ कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर शनिवारी रात्री ही रक्कम सापडली आहे.

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

रोख रक्कम सापडलेल्या कारचालकाकडे कोणतेही कागदपत्रे नव्हती. तेसच रोख रकमे बाबत देखील समाधान कारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला असून एवढे मोठे पैसे कुठून आले? ते कुणाचे आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर देखील पोलिसांकडून तपासणी सुरू होती. शनिवारी रात्री एका संशयित कारला पोलिसांनी थांबवले. त्यात एका ट्रंकमध्ये पोलिसांना तब्बल एक कोटी रुपये सापडले.

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

कार चालकाकडे या रकमेचे कोणतेही कागदपत्रे आणि पुरावे नव्हते. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कार क्रमांक एम एच २३ एचडी ०३६६ ही गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरू आहे.

रक्कम कोषागार कार्यालयाकडे देणार

सापडलेली रक्कम ही दहा लाख रुपयापेक्षा जास्त असल्याने कोषागार कार्यालयाला दिली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती का याची तपासणी करत आहेत. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली जात आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथे ५, १०, २०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या.

विभाग