बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन

बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन

Jan 08, 2025 01:36 PM IST

Beed News : बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची चर्चा असतांना आता शहर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जिवन संपवलं आहे.

बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन
बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन

Beed News : बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेला जात आहे. मस्साजोग येथील संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयाडी आणि एसआयटी मार्फत सुरू आहे. या सर्व तपासात आता बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपवलं आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समजू शकलं नाही. या घटनेमुळे जलहयात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचा संबंध संतोष देशमुख प्रकरणाशी आहे का ? या बाबत सध्या चर्चा सुरू आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडी व एसआयटीचे पथक बीड शहरात आहे. दोन्ही तपास यंत्रानेकडून तपास केला जात आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात देखील या प्रकरणी चौकशी केली जात आहे. सध्या याच पोलिस ठाण्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला देखील पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्यात, पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

अनंत इंगळे यांनी कोणत्या कारणाने अथवा दबावातून हे पाऊल उचललं याचा तपास पोलिस करत आहे. दरम्यान, आरोपी वाल्मीक कराडशी बीडमधील पोलिसांचे संबंध असल्याचे आरोप होत आहे. तपास पथकातील एका पोलीसाचा आणि वाल्मीक कराडचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या नंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला पथकातून बाहेर काढण्यात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर