Beed Crime news : बीडमध्ये गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आणखी एका सरपंचाला मारहाण करण्यात आल्याची घटना उघकडीस आली आहे. व्यवसायात भागीदार असलेल्या या माजी सरपंचाला आधी लुटण्यात आलं. यानंतर त्याच्या पायाला कुलूप लावून त्याला डांबून ठेवण्यात आलं. स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत या व्यक्तिने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर इंगळे असे पीडित माजी सरपंचाचे नाव असून दत्ता तांदळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर इंगळे व दत्ता तांदळे हे दोघे मसाल्याच्या व्यवसायात भागीदार आहेत. ही दोघे व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेले होते. मंगळवारी मुंबईला जात असतांना दत्ता तांदळे याने ज्ञानेश्वर इंगळे याला एका ठिकाणी डांबून ठेवले. इंगळे यांच्या जवळ असलेली १ लाख रुपयांची रक्कम त्याने लुटली. एवढेच नाही तर इंगळे यांना मारहाण देखील केली. आरोपी दत्ता तांदळे एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ज्ञानेश्वर इंगळे पळून जाऊ नये यासाठी त्यांच्या पायाला कुलूप देखील लावले. यानंतर त्यांना एका निर्जन खोलीत डांबून ठेवण्यात आले. दरम्यान, यातून स्वत:ची कशी बशी सुटका ज्ञानेश्वर इंगळे याने केली. तसेच पायाला कुलूप लावलेल्या अवस्थेत थेट पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी दत्ता तांदळे याने देखील पाटोदा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकाराची चर्चा गावात रंगली आहे.
काय म्हणाले पीडित सरपंच ?
या प्रकरणातील पीडित माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे म्हणाले, मी माजी सरंपच असून माझा मसाल्याच्या व्यवसाय आहे. आमचा २० लाखांचा व्यवहार होता. मी केजच्या कळंब चौकातून मुंबईला जात असतांना माझं अपहरण करण्यात आलं. यावेळी माझ्याकडे २ लाख रुपये होते. अपहरण करणाऱ्यांनी माझ्याकडून पैसे लुटले. माझा मोबाईल देखील त्यांनी काढून घेतला. मला त्यांनी पाटोद्याला एका खोलीत बांधून मारहाण केली. माझ्या पायाला कुलूप देखील लावलं. यातून मी कशी बशी सुटका करत थेट पोलिस ठाणे गाठले.
संबंधित बातम्या