Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले व अन्य गुन्हेगाराचे एकत्रित २९ नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातीलया आरोपींचे एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. अवादा पवनचक्की कंपनीला ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली त्याच दिवशी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे केजमधील विष्णू चाटे याच्या कार्यालयात एकत्र प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देऊन खंडणी मागितल्याची तक्रार आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. वाल्मीक कराड, सुदर्शन घुले,विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजीच एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेले होते, ही बाब सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाली आहे.
खंडणीच्या प्रकरणातपोलीस कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या जामीनावर लवकरच सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच खंडणीच्या दिवशीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये वाल्मीक कराड त्याच्या गँगसोबत दिसत आहे. या व्हिडिओमुळेवाल्मीक कराडच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. कराड यानेविष्णू चाटेच्या मोबाईलवरूनअवादा पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरला कॉल करून २ कोटी रूपयांची खंडणी मागितली होती.त्याबाबत दावे-प्रतिदावेकेले जात होते.आवाजाचे नमुने घेतले जात होते. त्यातच आता हा व्हिडिओसमोर आल्याने पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.
पोलिसांच्या हाती आलेल्या या व्हिडिओत वाल्मीक कराड,विष्णू चाटे,सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्रितपणे दिसत आहेत. दुपारी १२ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
मस्साजोगगावाच्या परिसरात पवनचक्की उभारण्यात आल्या आहेत. त्यातील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या व मकोकातील आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे.
खंडणी व देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन आहे. २ कोटी रुपयांपैकी ५० लाख निवडणूक काळात दिले होते. उर्वरित रक्कम घेण्यासाठी वाल्मिकची गँग कंपनी कार्यालयात गेली असता तेथे त्यांची सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून बोलावले. देशमुख यांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते. खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीमार्फत केला जात आहे.
संबंधित बातम्या