संतोष देशमुख हत्या : फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतोष देशमुख हत्या : फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

संतोष देशमुख हत्या : फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

Dec 28, 2024 04:38 PM IST

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या करण्यात आली, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या- अंजली दमानिया
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या- अंजली दमानिया

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्त्यारोप सुरू आहेत. मात्र, याप्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

अंजली दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, 'काल रात्री मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्क नसल्यामुळे आमचे बोलणे होऊ शकले नाही.त्यानंतर त्या व्यक्तीने मला व्हॉईस नोट पाठवली. ज्यात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी आता कधीच सापणार, कारण त्यांची हत्या झाली, अशी माहिती त्या व्यक्तीने दिली. हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, हे ऐकून मी हबकलेच. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.मस्साजोगचे गावचे सरपंच देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वादळ उठले आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात ४५ कलमान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेला माणूस धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. बीड जिल्ह्यात एक हजार २२२ शस्त्र परवाने असल्याचेही दमानिया यांनी निदर्शनास आणून दिले. एवढ्या मोठ्या संख्येने शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणी जिल्ह्यात केवळ ३२ आणि अमरावती जिल्ह्यात २४३ रुग्ण आहेत. मग बीड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने का आणि कोणाच्या अधिकाराने ते देण्यात आले? कराड यांच्या नावावर शस्त्र परवाना असला तरी त्यांच्या गटातील कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणताही परवाना नसला तरी ते जाहीरपणे बंदुका दाखवताना दिसले. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी विनंती मी बीडच्या एसपी नवनीत कावत यांच्याकडे केली आहे, असे दमानिया यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर