बीड जिल्ह्यात अहमदपूर-अहमदनगर महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा येथील ससेवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप व्हॅन व ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तसेच अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही जण वाहनांच्या खाली अडकले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावरील दृष्य भीषण होते.
शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पडलेली नाही. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेह रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली असून वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटर व अन्य साहित्य मागवले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-नांदेड महामार्गावर शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे हा अपघात झाला. संकेत पाशेमवाड (वय १७) आणि वैभव येळने (१८) अशी ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भोसी गावातील संकेत व वैभव शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. दोघे मित्र शेतकरी कुटुंबातील आहेत. नांदेड-भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही विद्यार्थी चालत जात होते. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली मात्र धडक दिल्यानंतर वाहन चालकाने न थांबता तेथून पसार झाला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या