Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या मंडपातच ९ वर्षांच्या चिमुरड्याचा तडफडून गेला जीव, बीडमधील घटना
Beed Accident : बीडच्या आष्टी शहरात ही घटना घडली. शहरातील जय भोले गणेश मंडळासमोर लावलेल्या लाईटच्याडेकोरेशन माळेचा शॉक लागल्याने९वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.
बीड – राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून मंगळवारी घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवामुळे राज्यात सगळीकडे आनंदी व उत्साही वातावरण असताना राज्यातील काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोल्हापुरात बाप्पांची मूर्ती घरात आणतानाच एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
ट्रेंडिंग न्यूज
त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना डिजेवर चढून नाचताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर वीज जिल्ह्यातून अशाच प्रकारची दुदैवी घटना समोर आली आहे. येथे ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
बीडच्या आष्टी शहरात ही घटना घडली. शहरातील जय भोले गणेश मंडळासमोर लावलेल्या लाईटच्या डेकोरेशन माळेचा शॉक लागल्याने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवतेज सोंडगे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
आष्टी शहरातील संभाजीनगर येथे जय भोले गणेश मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. लोखंडी तार लावून त्यावर लाइटच्या माळा लावल्या आहेत. याचा शॉक लागून शिवतेज सोंडगेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महादेव सोंडगे यांच्या फिर्यादीवरून मंडप मालक सुभान फकीर शेख (रा. डोनगाव, ता. जामखेड) याच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने आष्टी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग