पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० ते २५ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! काहींची प्रकृती गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० ते २५ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! काहींची प्रकृती गंभीर

पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० ते २५ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! काहींची प्रकृती गंभीर

Updated Oct 14, 2024 08:54 AM IST

honey bee attack on rajgad fort : रविवारी दुपारी राजगड किल्ल्यावर मधमाशांनी काही पर्यंतकांवर हल्ला केला. यात २० ते २५ पर्यटक जखमी झाले. या पर्यटकांना इतर व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या टीमने वाचवले.

पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! डंखामुळे काहींची प्रकृती गंभीर
पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! डंखामुळे काहींची प्रकृती गंभीर

honey bee attack on rajgad fort : राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला परिसराजवळ रविवारी (दि १३) किल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या २० ते २५ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात काही पर्यटक हे जखमी झाले. या पर्यटकांना बारामतीहून आलेल्या एका पर्यटकांच्या गटाने व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या टीमने वेळेत मदत केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे किल्ल्यावर शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या आनंद लुटण्यासाठी आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे बालेकिल्लाजवळ जमले होते. यावेळी या ठिकाणी असलेल्या मधमाशांच्या पोळ्यासोबत काहींनी धक्का लावण्याने मधमाश्यांनी पर्यंतकांनवर हल्ला केला. मधमाशा पर्यटकांना डंख मारू लागल्याने गडावर असलेल्यांची धावपळ सुरू झाली. अनेकजण मदतीसाठी ओरडत होते. या घटनेमुळे दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अनेक पर्यटक बचावासाठी झाडझुडपात पाळत होते. तर तर काहींनी मधमाशांपासून वाचण्यासाठी गडावरील पद्मावती तलावात उड्या मारल्या. या घटनेत बहुतेक पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, अंधेरी पश्चिम, मुंबई येथील प्रथम अहिरे या २४ वर्षीय मुलांची परिस्थिती गंभीर आहे. त्याला अनेकवेळा डंख मारल्याने अहिरेला मोठा त्रास झाला. त्याची प्रकृती ही गंभीर झाली होती.

गडावर गोंधळाचे वातावरण

सुदैवाने बारामती येथून आलेल्या एका पर्यंतकांच्या एका पथकातील रणजीत बिचकुले, मारुती वाघमारे, योगेश मलगुंडे, अनिकेत मलगुंडे आणि स्वप्नील खरात यांनी त्यांना तातडीने वैद्यकीय मदत दिली. त्यांनी अहिरे यांच्या अंगावरील मधमाशांचे डंख काढून, त्याला पाणी दिले आणि सुरक्षितपणे गडाच्या खाली उतरवले. जखमींवर स्थानिक शाळेतील शिक्षक संतोष उत्तरकर यांच्या मदतीने अहिरे यांना साखर गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहिरे यांनी नंतर बचावकर्त्यांना माहिती दिली की, त्यांच्या गटातील विशाल गायकवाड आणि शुभम खरे या दोन सदस्यांनी मधमाशांपासून वाचण्यासाठी झुडपात उडी मारली होती.

बारामतीच्या पर्यटकांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे आणि विशाल पिलावरे यांनी मदत पाठवण्यासाठी स्थानिक पोलिसांशी समन्वय साधला. पोलीस अधिकारी शांताराम उर्फ ​​मंगेश भोसले यांच्या मदतीने चोर दरवाजा दरीत अडकलेल्या दोन पर्यटकांची सुटका करण्यात आली.

या घटनेबद्दल बोलताना रणजीत बिचकुले यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गडावर अधिक चांगली खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली. पुरातत्व विभागाचे बापू साबळे यांनी पर्यटकांना अत्तर लावणे, तसेच सुगंधित पदार्थ सोबत बाळगणे टाळण्याचे आवाहन केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर