मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: संघर्ष करायला तयार राहा; कार्यकर्त्यांना सूचना
शरद पवार जयंत पाटील
शरद पवार जयंत पाटील

Sharad Pawar: संघर्ष करायला तयार राहा; कार्यकर्त्यांना सूचना

23 June 2022, 16:03 ISTNinad Vijayrao Deshmukh

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शरद पवार यांनीही मुंबईतील सिल्वर ओक येथे बैठक घेतली असून कुठल्याही परिस्थीती संघर्ष करायला तयार रहा अशा सुचना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत.

Maharashtra Political crises राज्यात सुरू असलेल्या मोठ्या उलथा पालथी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेते आणि आमदार यांची बैठक घेतली. या आमदारांना त्यांनी कुठल्याही परिस्थीती संघर्ष करायला तयार रहा अशा सुचना दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठींबा कायम आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिधिंशी संवाद सांधला. पाटील म्हणाले, शिवसेनेचे काही आमदार हे बाहेर गेले आहेत. ते परत येतील अशी आशा आहे. सध्या राजकीय परिस्थीती बघता संघर्ष करण्यासाठी तयार रहा अशा सुचना करण्यात आल्या आहेत. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांशी संध्याकाळी बैठक घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगिलते. या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार टिकावं अशी आमची इच्छा असल्याचेही पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार टीकावे ही इच्छा आहे. मात्र, असे झाले नाही तर विरोधी बाकावर बसण्याची तयारीही आमची आहे. विरोधी बाकावर कुणी इच्छेने बसत नाही. तशी परिस्थीती निर्माण झाली की बसावेच लागते असेही पाटील म्हणाले. सरकार टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले राज्याबाहेर गेलेले शिवसेना आमदार माघारी येतील असा विश्वास आहे. हे जे काही चालेले आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हा वाद निवळेल असा विश्वास आहे. सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहतील आणि त्यांचे आमदार झुगारणार नाहीत असेही पाटील म्हणाले.