Mumbai csmt station theft : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवर मोठी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी रेल्वे स्थानकाच्या टॉयलेट बाथरूममधून तब्बल १२ लाख रुपयांचे नळ आणि तोट्या लंपास केल्या आहे. या चोरीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. लांब पल्ल्याच्या गड्यांसाठी असलेल्या स्थानकाजवळ असलेल्या नव्या वातानुकूलित टॉयलेट बाथरूममध्ये ही चोरी झाली आहे. ही व्यक्ति रेल्वे स्थानकातील व्यक्तीने केल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नुकतेच बांधण्यात आलेल्या एसी टॉयलेटसह, रनिंग रूम आणि सार्वजनिक शौचालयांमधून १२ लाख रुपयांचे बाथरूम फिटिंग चोरट्यांनी लंपास केले आहे. ही चोरी ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी झाली.
चोरट्यांनी टॉयलेट बाथरूम मधील जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, टॅप, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स अशा ७० वस्तु लंपास केल्या. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'हे एका आतल्या व्यक्तीचे काम असल्याचे दिसते, कारण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच या खोलीत प्रवेश करण्याची परवानगी आहे.
अधिकारी म्हणाले, 'कंत्राटदार कामगार कर्मचाऱ्यांनाही ही चोरी केली असू शकते. स्वच्छतागृहाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरी कुणी केली हे ओळखणे आव्हान आहे. प्रत्येक जेट स्प्रेची किंमत १६०० रुपये आहे. चोरलेल्या १२ वस्तूंची किंमत १९ हजार २०० रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय २८ हजार ७१६ रुपये किमतीची ६ नाणीही गायब आहेत. विशेष बाब म्हणजे ४ जानेवारीलाच एसी टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. सर्व मुद्देमाल हा १२ लाख रुपयांचा आहे.