बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री

बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री

Dec 30, 2024 06:00 AM IST

Baramati Wrestling rooster : बारामतीत बोकडाच्या वजनाचा कोंबडा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. हा कोंबडा दूध पिणारा असून सर्वांचे आकर्षण ठरला आहे.

बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री
बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री

Baramati Wrestling Rooster : रोज पेलाभर दूध, खारीक, बदाम या सह खास खुराक....तुम्हाला वाटेल हा एका पैलवानाचा खुराक असेल. तर उत्तर आहे नाही. हा खुराक चक्क एका कोंबड्याचा आहे. बारामतीचा राजा असे नाव असलेल्या या कोंबड्याची सध्या बरीच चर्चा आहे. तब्बल ६ किलो वजनाचा आणि ५० हजार रुपयांचा भाव असलेल्या या कोंबड्याने अनेक कृषि प्रदर्शनात बाजी मारली आहे.

बारामतीचा राजा हा रुबाबदार आहे. एक वर्ष वयाचा आणि तब्बल ६ किलो वजनाचा हा कोंबडा पाहून सर्व जण चकित झाले आहे. राजाची बॉडी एखाद्या पैलवाना सारखी आहे. त्याच्या तगड्या शरीर यष्टी साठी त्याची खास काळजी घेतली जाते. आपल्या लाडक्या राजाबद्दल त्याचे मालक यशराज घाडगे यांनी खास माहिती दिली आहे. नुकतेच सोलापूर येथे झालेल्या कृषि प्रदर्शनात राजा हा सर्वांचे आकर्षण ठरला आहे.

दूध पिणारा कोंबडा

बारामतीचा राजा असलेल्या या कोंबड्याची त्याचे मालक यशराज घाडगे चांगली निगा रखतात. 'राजा कोंबड्या'ची खुराक एखाद्या पैलवाना सारखी आहे. रोज सकाळी त्याला मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा खाण्यासाठी दिला जातो. तर दुपारीसुद्धा भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य त्याला खायला दिलं जातं. राजाला संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिलं देखील जातं. हा खुराक रोजचा असून त्यात खंड पडू दिला जात नाही.

तब्बल ६ किलो वजन अन् भाव ५० हजार

राजा कोंबडा हा वनराज क्रॉस जातीचा आहे. विविध प्रदर्शनात या कोंबड्याला पाहून सर्वच आश्चर्यचकित होत आहेत. या कोंबड्याचे वजन ६ किलो असून त्याला तब्बल ५० हजार रुपये भाव मिळाला आहे. एखाद्या बोकडा प्रमाणे या कोंबड्याला मागणी आहे. पण तो घरचा सदस्य झाला असून त्याला कितीही किंमत आली तरी विकणार नसल्याचं मालक यशराज घाडगे यांनी सांगितलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर