लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही राजकारणाचा केंद्रबिंदू बारामती मतदारसंघच राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण चांगलंच तापत असताना आता बारामतीत गब्बरचं पत्रया नावाने एक पत्र व्हायरल होतं आहे. या पत्रामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केलेला आहे. या पत्रामुळे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धूसफूस उघड होत आहे.ने मकं काय लिहिलं आहे पत्रात पाहूया..
स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांना तडाखा देण्यासाठी दादांची बदनामी करून त्यांना राजकीय पायउतार करण्याचा डाव खेळला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पत्रामधून करण्यात आला आहे.
नमस्कार बारामतीकर, अनेक वर्षे झाली बारामतीकर साहेब,दादा व ताईंवर प्रेम करतात. मतदान रुपी आशीर्वाद देतात. मग देशात राज्यात व जिल्ह्यात साहेब, दादा, ताई आपल्या कर्तुत्वाच्या व विकासाच्या जोरावर ठसा उमटवतात. मात्र आता सर्वांना माहिती आहे की, बारामतीचं राजकारण गढूळ होताना दिसत आहे. स्थानिक नेत्यांना भलतीच स्वप्नं पडू लागली की काय, साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचाय की काय,मित्रांनो हे सर्व प्रश्न म्हणजे बारामतीकरांच्या मनातील कुजबूज, जी भितीपोटी जोराने बोलली जात नाही. जो बोलेल तो मुस्लिम असला की, आतंकवादी, दलित असला की, नक्षलवादी आणि ओबीसी असला की देशद्रोही अशी चर्चा तर कसब्याापासून आमराईपर्यंत ऐकायला मिळते. म्हणून हा पत्रव्यवहार बारामतीकरांसाठी
बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं. मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला. बँकेचे अध्यक्षपद, नियोजन समितीचे सदस्यपद, बारामतीचे गटनेतेपद मिळवत दादांच्या गळ्यातील ताईत झाला. मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड (जाती) बघून पैशाचं वाटप केलं.
बाहेरून घड्याळ व आतून तुतारी वाजवली. बारामतीकरांच्या भावनेला ढाक लावून पाडले. दोन्हीकडून मलिदा खात मतदारांची फसवणूक केली. मात्र आतातर मजल एवढी वाढली की चक्क नेत्याचीही फसवणूक केली. हीच तर खरी मलिदा गँग. वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला?की आता दादांच्या मागे लागलात.