pune crime: दुचाकी चोरणारी मोठी टोळी जेरबंद; दोन टेम्पो भरुन २७ दुचाकी केल्या पोलिसांनी हस्तगत
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या कडून तब्बल १३ लाख रुपयांच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पुणे : बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या घटना थांबविण्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे होते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास पथक बनवत सीसीटीव्ही तपासत ४ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या कडून तब्बल विविध कंपन्यांच्या १३ लाख ५० हजार रुपयांच्या दोन टेम्पो भरुन २७ दुचाकी या जप्त केल्या आहेत. आता पर्यन्तची ही मोठी कारवाई समजली जाते.
ट्रेंडिंग न्यूज
या प्रकरणी पोलिसांनी विजय अशोक माने (वय १९), प्रदीप रघुनाथ साठे (वय २२, रा. शिरवळ, खंडाळा, जि . सातारा), प्रेम सुभाष इटकर(वय १९, रा. मिलिंदनगर, जमखेड, जि. अहमदनगर, संतोष तुकाराम गाडे (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नवे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पिटल, व्ही. पी कॉलेज, पेन्सिल चौक या परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी गेल्या होत्या. पोलिसांना चोरट्यांचा शोध लागत नव्हता. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सहायक पोलिस निरीक्षक योगेश लुंगटे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस अमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक अमोल नरुते, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय माने, शशिकांत दळवी, दीपक दराडे यांना दिली. या पथकाने शहरातील सर्व सीसीटीव्ही यांची कसून तपासणी केली. यात चोरटे हे चोरी करत असताना आढळले. सीसीटीव्ही फुटेज वरुन पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना शिताफीने अटक केली. त्यांच्या कडून तब्बल दोन टेम्पो भरुन २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची किंमत ही तब्बल १३ लाख ५० हजार रुपये एवढी आहे.