namo rojgar melava: बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या येणार एकाच मंचावर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  namo rojgar melava: बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या येणार एकाच मंचावर

namo rojgar melava: बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या येणार एकाच मंचावर

Updated Mar 02, 2024 07:54 AM IST

namo rojgar melava baramati : बारामती (baramti news) येथे आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आले असून या साठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येणार आहे. दरम्यान, शरद पवार आणि अजित पावर हे देखील एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा होणार असून या निमित्त ; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत.
बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा होणार असून या निमित्त ; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत.

namo rojgar melava: आज बारामती येथे विद्यप्रतिष्ठानच्या (vidya pratishthan) आवारात नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या साठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बारामती दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकाच मंचावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यानंतर पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

hot summer in Maharashtra : यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र होरपळणार! राज्यात विविध भागात येणार उष्णतेची लाट

बारामती येथे नमो रोजगार मेळाव्याचे २ आणि ३ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या माध्यमातून अजित पावर हे शक्ति प्रदर्शन करणार आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास ४३ हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद झाला होता. जेष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नावे कार्यक्रम पत्रिकेवरून वगळण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी खोचक पत्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत त्यांना जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, व्यस्त असल्याचे कारण देत दोघांनीही हे निमंत्रण नाकारले आहे. दरम्यान, सावरासावर करत प्रशासाने शरद पवार यांना देखील आमतंत्रण दिले असल्याने ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

बारामतीत होणाऱ्या नमो मेळाव्यानिमित्त अजित पवार शक्ति प्रदर्शन करणार आहेत. सुनेत्रा पवार यांना उभे करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. नमो रोजगार मेळाव्या निमित्त महायुतीचे बडे नेते बारामतीत येणार असल्याने अजित पावर गटात नवचैतन्याचे वातावरण आहे. 

Pune lonavla railway megablock: पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक!अनेक लोकल रद्द, तर काही उशिराने धावणार

या रोजगार मेळाव्यात तब्बल ४३ हजार तरुणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. हा मेळावा शासकीय असला तरी आज कार्यक्रमात राजकीय भाषणं होणार आहे. यातूनच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमात काय होणार या कडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Whats_app_banner