Baramati lok sabha : "बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati lok sabha : "बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले...

Baramati lok sabha : "बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले...

Jun 04, 2024 11:07 PM IST

Baramatiloksabharesult 2024 : सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवार यांनी बच्चा बडा हो गया असे ट्विट करत अजित पवारांना टोला लगावला आहे. निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी रोहित पवारांना बच्चा म्हणून हिणवलं होतं.

रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला

Baramati Lok Sabha Result 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लावले होते. या मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटूंबात सामना रंगला होता.   विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या वहिनी व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या. अतिशय चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळीपासून सुरू होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. सुळे यांच्या विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) सुनेत्रा पवार या सुरवातीपासूनच पिछाडीवर असलेल्या दिसून आल्या. बघायला मिळाल्या. सुळेंच्या निर्णायक विजयावर आमदार रोहित पवार यांनी X पोस्ट करत अजित पवारांवर टीका केला आहे.

रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट -

"बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय, असा टोलाही राहित पवार यांनी लगावला आहे.

"बारामतीत सुप्रियाताईंचा#विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन, असंही रोहित पवार म्हणाले.

बारामतीत सुनेत्रा पवार १ लाखांच्या फरकाने पराभूत

बारामती मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. सुप्रिया सुळे यांनी एक लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. अजित पवारांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामतीमध्ये तळ ठोकला होता. अनेक सभा घेत जनतेला साद घातली होती. भावनिक होऊन जाऊ नका, कोणाचं ऐकू नका, माझंच ऐका अशी वक्तव्ये केली होती. बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवारांना होता. मात्र निकालावरून स्पष्ट झालं की, बारामतीकरांचा जिव्हाळा थोरल्या साहेबांबरोबरच आहे. अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचे या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. बारामतीत सर्वत्र जल्लोषचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत, साहेबांचा नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला गेला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या