लाडक्या बहिणींची अरेरावी! बँक कर्मचाऱ्यांशी घालत आहेत वाद; संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी-bank organization demands protection for mukhyamantri mazi ladki bahin yojana womens huge crowd in banks ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाडक्या बहिणींची अरेरावी! बँक कर्मचाऱ्यांशी घालत आहेत वाद; संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी

लाडक्या बहिणींची अरेरावी! बँक कर्मचाऱ्यांशी घालत आहेत वाद; संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी

Aug 18, 2024 09:53 AM IST

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा केल्यावर बँकेत महिलांची गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी बँक कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून महिला आणि कर्मचाऱ्यांची भांडणे होऊ लागली आहेत.

लाडक्या बहिणींची अरेरावी! बँक कर्मचाऱ्यांशी घालत आहेत वाद; संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी
लाडक्या बहिणींची अरेरावी! बँक कर्मचाऱ्यांशी घालत आहेत वाद; संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले आहे. पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. शनिवारी पुण्यात थाटात या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला. मात्र, आता ही योजना बँक कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले आहेत का, हे तपासण्यासाठी तसेच केवायसी पूर्ण करण्यासाठी महिला बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच काही महिलातर पैसे आलेत का नाही आले यावरून देखील बँक कर्मचाऱ्यांची हुज्जत आणि वाद घालत असून भांडणे करू लागली आहेत. यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडत आहे. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण येऊ लागला आहे. काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यात माहिती घेतांना त्यांचा बँकेतील कर्मचाऱ्यांची वाद होऊ लागला आहे. याच कारणामुळे बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षा सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली आहे.

काय म्हंटलं आहे संघातांनी

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार ने महिलांच्या खात्यात पैसे जमा केले असून ज्यांच्या खात्यात पैसे जमा अहळे नाहीत, अशा महिला बँकेत गर्दी करू लागल्या आहेत. केवायसी अपडेट नसल्याने त्यांच्यात तसेच लवकर योजनेचा लाभ मिळवा या साठी महिला बँक कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. बँकेत महिलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बँक कर्मचारी संघटनेने बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

तीन महिन्यांचे ४५०० रुपये मिळणार

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महिलांना जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रूपये मिळाले आहेत. तर अर्ज अद्याप मंजूर न झालेल्या व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये मिळणार आहे. या कारणामुळे बँकांमध्ये गर्दी होत आहे. महिला आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेत अपडेट करत आहेत.

विभाग