Bank Holidays List : तंत्रज्ञाच्या प्रगतीमुळे रोज बँकेत जाऊन काम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, असे असेल तरी काही कामे ही बँकेत जाऊनच करावी लंगत असतात. या साठी बँकेत जाणे गरजेचे असते. त्यामुळे जर पुढच्या आठवड्यात जर तुम्ही बँकेत जाण्याचे नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, तुमची बँकेची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. लोकसभा इलेक्शन आणि शनिवार रविवार सुट्ट्या यामुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता असल्याने नियोजन करून बँकेची कामे उरकावी लागणार आहे. नाही तर ही कामे लांबणीवर पडतील.
सोमवारी राज्यातील काही मतदार संघात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यामुळे या दिवशी बँका या बंद राहणार आहेत. ज्या शहरात मतदान आहे तेथे बँक बंद राहणार आहे. तर १९ मे रोजी बँकांची आठवडी सुट्टी व सोमवारच्या सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. त्यामुळे सोमवारी बँकेत जाण्याचे नियोजन फसणार आहे. मतदानाच्या दिवशी शहरांमध्ये टप्प्यांनुसार बँका बंद राहतील असे निर्देश रिझर्व्ह बँके दिले आहे.
त्यामुळे सोमवारी देशातील ६ राज्य आणि ४९ मतदारसंघांत बँका बंद राहतील. लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू काश्मीरचा या राज्यातील काही मतदार संघात मतदान होत असल्याने येथे बँका बंद राहणार आहेत. तर उर्वरित राज्यांत मात्र बँका सुरु राहतील. मुंबई व बेलापूर येथील बँका या दिवशी पूर्णपणे बंद रहाणार आहे.
मे महिन्याच्या अखेरिस २३ मे रोजी बुद्धपौर्णिमा आणि २५ मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळे देखील बँका या बंद राहतील. तर २५ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार व २६ मे रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळं येत्या आठवड्यात बँका फक्त चार दिवस सुरु राहणार आहेत. बँकेचे व्यवहार बंद राहणार असल्याने नागरिकांनी डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग द्वारे व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.