Ladki bahin yojana Fraud : राज्यसह देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं आहे. आता हे नागरिक देशातील शासकीय योजनांचा देखील लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत एका बांग्लादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात ही महिला वास्तव्यास असून तिने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज मंजूर झाला होता व तिला या योजेचे पैसे देखील देण्यात आल्याच उघड झालं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून ५ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेल व तिच्यासोबत आणखी ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या आणखी किती जणांनी बेकायदेशीर लाभ घेतला असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्यात गेल्या जुलै महिन्यापासून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचा लाभ मिळाला नाही. तब्बल साडे चार लाख महिलांनी या योजनेच्या निकषांविरोधात जाऊन अर्ज केले होते. दरम्यान, त्यांना स्वत:हून त्यांनी अर्ज मागे घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेय. दरम्यान, काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा देखील घेतल्याचं समोर आलंन आहे.
संबंधित बातम्या