बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! बनावट कागदपत्रांच्या आधारे बनली होती रिया बर्डे-bangladeshi porn star riya barde arrested over faking documents for indian passport ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! बनावट कागदपत्रांच्या आधारे बनली होती रिया बर्डे

बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! बनावट कागदपत्रांच्या आधारे बनली होती रिया बर्डे

Sep 27, 2024 11:21 AM IST

Porn Star Riya Barde Arrested: पॉर्न स्टार रिया बर्डे हिला महाराष्ट्र पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे. चौकशीत ती बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. पॉर्न जगतात रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावाने ओळखले जाते.

बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! रिया बर्डे बनून खोट्या कागदपत्राच्या आधारावर करत होती वास्तव्य!
बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! रिया बर्डे बनून खोट्या कागदपत्राच्या आधारावर करत होती वास्तव्य!

Porn Star Riya Barde Arrested from Ulhasnagar: ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. ही पॉर्नस्टार आपल्या कुटुंबासह बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘भारतीय’त्वाची ओळख मिरवत अनधिकृतरित्या राहत असल्याचं तपासात पुढं आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपासात पॉर्न स्टार रिया बर्डे ही बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. पॉर्न जगात रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. मूळ बांगलादेशी असूनही रिया बनावट कागदपत्रांद्वारे तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे राहत होती. रियाचे आई आणि वडील कतारमध्ये आहेत, तर पोलीस रियाच्या भावाचा आणि बहिणीचा शोध घेत आहेत.

रिया बर्डे मूळची बांगलादेशी असून ती तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचा आरोप आहे. याच हेतूने रियाच्या आईने अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप आहे. रियाशिवाय पोलिसांनी तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाझ शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांच्यावरही बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रियाला ठाणे जिल्ह्यातील उल्लासनगर भागातून अटक केली.

राज कुंद्राच्या प्रॉडक्शनमध्येही केले आहे रियाने काम

पोलिसांनी सांगितले की, रिया हिने राज कुंद्राच्या प्रोडक्शनमध्ये काम केले आहे. तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक संग्राम मालकर यांनी सांगितले की, "तपासात आम्हाला आढळून आले की रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे आणि ती रिया, तिच्या दोन मुली आणि मुलासह भारतात बेकायदेशीरपणे राहत होत्या. रियाची आई पश्चिम बंगालमध्ये राहत होती. तिने अमरावती येथील अरविंद बर्डे यांच्याशी भारतात रहाण्याच्या हेतूने लग्न केले आणि नंतर तिने बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःसाठी आणि तिच्या मुलांसाठी भारतीय पासपोर्ट मिळवले.

रियाचे आई आणि वडील कतारमध्ये पोलिस भावांच्या सोधात

रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर पोलीस तिच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत.

मित्रामुळे बिंग फुटलं

रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीरपणे भारतात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्याने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रियाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Whats_app_banner