मुंबई हादरली! वांद्र्यात पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई हादरली! वांद्र्यात पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई हादरली! वांद्र्यात पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Published Oct 09, 2024 10:57 AM IST

Mumbai bandra rape case : मुंबईत वांद्रे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

मुंबई हादरली! वांद्र्यात पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार
मुंबई हादरली! वांद्र्यात पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Mumbai bandra rape case : पुण्यातील बोपदेव घाटात गेल्या गुरुवारी तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना ताजी असतांना आता मुंबईतील वांद्रे येथे एका १८ वर्षीय तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर काही तरुणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना, वांद्रेच्या निर्मलनगर परिसरात घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर दूसरा आरोपी फरार आहे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही तिच्या घरी जात होती. यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. तावसेच तिला लिफ्ट देत घरी सोडतो असे सांगितले. दरम्यान, तरुणीला आरोपींनी पिण्यासाठी पाणी दिले. या पाण्यात आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हे पाणी पिताच तरुणी ही बेशुद्ध झाली. या अवस्थेत टयांनी तिला निर्जन स्थळी नेत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

तरुणीला दिली जीवे मारण्याची धमकी

पीडित तरुणीही काही वेळाने शुद्धीवर आली. यावेळी तिची अवस्था बिकट होती. तिचे कपडे विवस्त्र होते. दरम्यान, आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आल्याने ती ओरडू लागली. यावेळी आरोपींनि तिला धमकावले. ही बाब कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी देखील पीडित मुलीला दिली. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला घरी सोडले. दरम्यान, या धक्क्यातून स्वत:ला सावरत पीडित तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले. तसेच तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले. 

यात तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं . निर्मलनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तर दूसरा आरोपी हा अफरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून लवकर त्याला अटक केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे मुंबईत महिला असुरक्षित असल्याच पुन्हा एकदा निष्पन्न झालं आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर