मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई-गोवा हायवेवर रेतीच्या ट्रकवर बंदी

Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई-गोवा हायवेवर रेतीच्या ट्रकवर बंदी

HT Marathi Desk HT Marathi
Aug 24, 2022 10:19 PM IST

गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाळू/रेती व इतर गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. (Ban on trucks transporting sand in Kokan during Ganpati festival)

Ban on trucks transporting sand in Kokan during ganpati festival
Ban on trucks transporting sand in Kokan during ganpati festival

गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच या मार्गावर ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाळू/रेती व इतर गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध करण्याचा आदेश आज, २३ ऑगस्ट २०२२, रोजी जारी केला आहे.

२७ ऑगस्ट २०२२ च्या मध्यरात्रीपासून ते १० सप्टेंबर २०२२ च्या रात्री आठ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. परंतु, दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांवर ही बंदी लागू नसेल. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू

गणेशोत्सवाच्या आधीपासून मुंबई, पुणेस्थित कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत दरवर्षी हा रस्ता चांगले नसल्याची ओरड करण्यात येत असते. यावेळी मात्र या रस्त्याचे काम युद्धगतीने सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते. तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, यावेळी कोकणात जाणारे रस्ते चांगले असतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या