Mumbai-Goa Highway : ‘या’ कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Goa Highway : ‘या’ कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

Mumbai-Goa Highway : ‘या’ कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

May 31, 2023 11:51 PM IST

shivrajyabhishek din : मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

किल्ले रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून लोक किल्ले रायगडावर दाखल होत असतात. या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत.

दिनांक ३१ मे ला रात्री १२ वाजेपासून २ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत तर ४ जूनला रात्री १२ वाजेपासून ते ६ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत महामार्गावरून १६ टन आणि त्याहून अधिक क्षमतेचे ट्रक,कंटेनर,मल्टी अँक्सल व्हेईकल, ट्रेलर्स, रेती आणि खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

दूध, इंधन, गॅस, औषध पुरवठा, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नसणार असल्याचे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा १ जून ते ७ जून या कालावधीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत.

 

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे गडावर दाखल होणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्गावरील तसेच वाकण पाली खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर