महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील 'हयात' आणि 'मातोश्री'वर झाली महत्त्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील 'हयात' आणि 'मातोश्री'वर झाली महत्त्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील 'हयात' आणि 'मातोश्री'वर झाली महत्त्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली?

Published Nov 22, 2024 07:36 AM IST

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या मतमोजणी होणार असून ९ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत, 'हयात' आणि 'मातोश्री'वर महत्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली ?
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत, 'हयात' आणि 'मातोश्री'वर महत्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली ?

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यावर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र, असं असलं तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात? हे स्पष्ट होणार आहे. उद्या शनिवारी निकाल लागळणार असून ९ नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यास पुढची रणनीती काय असणार या साठी आता मुंबईत खलबतं रचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत बुधवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

मुंबईत हॉटेल हयात येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत निकालानंतर काय रणनीती असावी या बद्दल चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, कुणाला किती जागा मिळणार या बद्दल देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मातोश्रीवरही अडीच तास खलबतं

हयात येतील बैठक आटोपून बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही चर्चा केली. तब्बल अडीच तास ही चर्चा झाली. त्यामुळे मुंबईत नेमकं चाललयं काय काय असा प्रश्न पडओय आहे. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर विजय महाविकास आघाडीचाच होईल असा दावा त्यांनी केला.

थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून त्यात आमच्या सर्वाधिक जागा येईल अस स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्हाला जुळवाजुळवीची गरज पडणार नाही. कुणाला आमच्या बरोबर यायचं असल्यास आम्हाला आनंद होईल. दरम्यान, निकाल स्पष्ट झाल्यावर आम्ही मुख्यमंत्री पदाबात चर्चा करू असे देखील थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोले गैरहजर

महाविकास आघाडीच्या नेत्यांनची महत्वाची बैठक सुरू असतांना नाना पटोले या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील उपस्थित होते. मात्र, या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते. संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरून टीका केली होती. त्यानंतर पटोले यांनी बैठकीला दांडी मारल्याने महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे, या बाबत चर्चा सुरू झाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर