मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : हा तर राज्यपालांचा दुटप्पीपणा,काँग्रसचा राज्यपालांवर आरोप

Maharashtra Politics : हा तर राज्यपालांचा दुटप्पीपणा,काँग्रसचा राज्यपालांवर आरोप

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 02, 2022 07:39 AM IST

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका दाखवायची आणि दुसरीकडे मात्र आता नवं सरकार सत्तेत आल्यावर आपल्या त्याच भूमिकेवरुन घूमजाव करायचं हा राज्यपालांचा दुटप्पीपणा असल्याचं थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात (हिंदुस्तान टाइम्स)

राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळलं खरं, मात्र आता दोन्ही काँग्रेस(Congress) नव्या सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेणार हे सरकार कोसळल्याच्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. एकीककडे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपण भाजपच्या (BJP) विरोधात दंड थोपटून उभं राहाणार असल्याचं स्पष्ट केलं असतानाच आता काँग्रेसही(Congress) आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतेय. काँग्रेसने आता थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनाच आपलं लक्ष्य केलं आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्याच एका भूमिकेचीआठवण करून दिली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड हा मुद्दा आता काँग्रेसने उचलून धरला आहे. राज्यात मविआचं सरकार असताना आपण तीन वेळा राज्यपालांची भेट घेत हा मुद्दा उचलून धरला होता.मात्र प्रत्येकवेळेस राजयपालांनी सर्वोच्च न्यायलयात या विषयीची याचिका प्रलंबित असल्याचं कारण दिलं होतं. आता मात्र विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपाल इतकी घाई का करत आहेत असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी थेट राज्यपालांना केला आहे.

राज्यात रविवार आणि समोमवारी राज्य विधीमंडळाचंं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्या अधिवेशनातच शिंदे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्याच वेळेस राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार असल्याच्या जोरदार बातम्या समोर येत आहेत. त्यामुळेच बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. एकीकडे मविआ सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका दाखवायची आणि दुसरीकडे मात्र आता नवं सरकार सत्तेत आल्यावर आपल्या त्याच भूमिकेवरुन घूमजाव करायचं हा राज्यपालांचा दुटप्पीपणा असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.ही राज्य घटनेची थट्टा असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

'विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आमचे शिष्टमंडळ तीनवेळा राज्यपालांना भेटले होते. अध्यक्षांची निवड करू द्या, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. आता मात्र ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबद्दल शंका उपस्थित होते. या निवडीसंदर्भात आम्ही जो कायद्यात बदल केला होता, तो वैध ठरला का? की जुन्याच पद्धतीने ही निवड केली जाणार आहे, याचे उत्तर अपेक्षित आहे.' असं बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांना विचारलं आहे.

WhatsApp channel