मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेबांच्या तैलचित्राचे विधीमंडळात अनावरण; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी, तर उद्धव ठाकरे गैरहजर

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे विधीमंडळात अनावरण; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी, तर उद्धव ठाकरे गैरहजर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2023 08:18 PM IST

BalasahebThackerayoilpaintinginauguration : महाराष्ट्राच्या विधीमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाकरे कुटूंबातून राजकारणात सक्रीय असणाऱ्यांमध्ये केवळ राज ठाकरे उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे विधीमंडळात अनावरण
बाळासाहेबांच्या तैलचित्राचे विधीमंडळात अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी विधीमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला एकमेव ठाकरे राज ठाकरे उपस्थित होते तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमाला येणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे कुटुंबाला स्वत: फोन करून या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं,पण तरीही ते आले नाहीत,अशी माहिती मिळत आहे.

विधीमंडळातील बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे,स्मिता ठाकरे,अनुराधा जयदेव ठाकरे,निहार ठाकरे उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे हेविधान भवनात दाखल झाले. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या गेटवर आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणावेळी ठाकरे कुटुंबातील कोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या