मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video: शेवटच्या भेटीत बाळासाहेब काय म्हणाले? मनसेकडून राज ठाकरेंचा 'तो' भावनिक व्हिडिओ ट्वीट
Raj Thackeray
Raj Thackeray

Video: शेवटच्या भेटीत बाळासाहेब काय म्हणाले? मनसेकडून राज ठाकरेंचा 'तो' भावनिक व्हिडिओ ट्वीट

23 January 2023, 11:45 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Balasaheb Thackeray Jayanti: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेबांशी झालेल्या भेटीबद्दल बोलत आहेत.

Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७वी जयंती आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. मनसे केलेल्या या ट्वीटमध्ये राज ठाकरे शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेबांशी झालेल्या शेवटच्या भेटीबद्दल सांगताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

“जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं मनसेने ट्वीट केलं आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील हा व्हिडिओ मनसेने ट्विट केला आहे.

मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे म्हणत आहेत की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की, हा पक्षात राहत नाही. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत ही गोष्ट कधीच बोललो नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडताना मनोहर जोशी माझ्यासोबत होते. मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावून घेतलं. माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा, असं राज ठाकरे या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

या व्हिडिओत राज ठाकरे पुढे बोलतात की, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.”