Eknath Shinde News: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटाकडून बीकेसीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना खरी कोण आहे? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असेच यश मिळणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है, अशी शायरी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, 'खरी शिवसेना कोण, यावर महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली. शिंदे गटाला 'शिवसेना' नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. तर, ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह देऊन शिवसेना उबाठा असे नाव देण्यात आले.'
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उबाठाने ९७ जागा लढविल्या आणि केवळ २० जागा जिंकल्या. तर, आम्ही ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. हा विजय नेत्रदीपक आहे. आता सांगा शिवसेना कोणाची खरी आहे. शिवसेना खरी कोण, यावर जनतेने कौल दिला आहे', असे शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या वारशाचे वारसदार आपणच आहोत. त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असेच यश मिळणे आवश्यक आहे. कोणत्याही पदापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा असतो. शिवसेनेच्या आदर्श आणि स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांशी गद्दारी केली जाणार नाही, असे पक्षाचे प्रमुख नेते शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती युतीने २८८ पैकी २३० विधानसभा जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेना उबाठाने २० जागा जिंकल्या. तर, काँग्रेसने १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत.
संबंधित बातम्या