BEST Bus: बकरी ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल; जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BEST Bus: बकरी ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल; जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

BEST Bus: बकरी ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल; जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

Jun 17, 2024 02:55 PM IST

Bakri Eid In Mumbai: बकरी ईद निमित्ताने मुंबईच्या अनेक भागांतील वाहतूक वळवण्यात आली.

बकरी ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आली.
बकरी ईदनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आली. (HT)

Mumbai Traffic: मुंबईत बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील अनेक भागांत रस्ते निर्बंध लादण्यात आले. परिणामी बेस्ट बसचे मार्ग शहराच्या उपनगरातून वळवण्यात आले. यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात थोडी गैरसोय होण्याची होत आहेत. दरम्यान, कोणत्या भागातील रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग कोणते, याबाबत जाणून घेऊयात.

ईदच्या सणानिमित्त धारावीतील ९० फुटी रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा मार्ग आज पहाटे ५ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा मार्ग सायन हॉस्पिटल - कुंभार वाडा मार्गे दोन्ही दिशेने वळवण्यात आला आहे. तर, टागोर नगर क्र.१ वाहतूकीसाठी बंद आहे. मार्ग १७६ आणि ४५३ पहाटे ५.४५ वाजल्यापासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे- लिंक रोड- गांधी नगर मार्गे दोन्ही दिशेने वळवण्यात आल्या आहेत.

याशिवाय, ३५७, ३७५, ३७६, ३७७, ३८० या मार्गाच्या बसेस सकाळी ०६.१५ केडी जंक्शन ते तानाजी मालुसरे चौक (गोवंडी स्टेशन रोड) दरम्यान जिजामाता भोसले मार्गे-बायंगण माळजुंना वाडी मार्गे डीएन दिशेने वळवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, मार्ग २२० आणि २२२ हे पहाटे ६.३० पासून वांद्रे तलावाऐवजी लिंकिंग रोड- मोती महल (४२२ मार्गे) मार्गे वळवले आहेत.

याचबरोबर मार्ग क्रमांक २३५ आणि २४२ च्या बसेस सकाळी ०७.३० पासून मौलाना झियाउद्दीन मार्गे वळवण्यात आल्या. बेस्टच्या म्हणण्यानुसार मालवणीतील अब्दुल हमीद मार्ग ‘नमाज’साठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मार्ग १८०, २०७, २४१, २५६, २७३, ३५९ आणि ४५९ सकाळी ८.०० वाजल्यापासून चुन्नीलाल गिरधारीलाल मार्गाने वळवले आहेत.

०६ जून २०२४ रोजी अर्धचंद्र दिसल्याची पुष्टी केल्यानंतर सौदी अरेबियाने रविवारी १६ जुलै २०२४ रोजी किंगडममध्ये ईद-उल-अजहा साजरी म्हणजेच बकरी ईद करण्याची घोषणा केली. जेव्हा युएई, कतार, जॉर्डन, कुवैत आणि इतर अरब देश कॅनडा, युनायटेड किंगडम, यूएसए आणि इतर पाश्चिमात्य देशांसह हा सण साजरा करतील. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इतर दक्षिण आशियाई देश आणि दक्षिण आफ्रिकेत ईद-उल-अजहा एक दिवसानंतर म्हणजे १७ जून २०२४ रोजी साजरी केली जाईल, कारण या प्रदेशांमध्ये ०७ जून रोजी अर्धचंद्र दिसला होता.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर