Badlapur Case : मीच 'त्या' मुलींवर लैंगिक अत्याचार केले! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची डॉक्टरांसमोर कबुली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Badlapur Case : मीच 'त्या' मुलींवर लैंगिक अत्याचार केले! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची डॉक्टरांसमोर कबुली

Badlapur Case : मीच 'त्या' मुलींवर लैंगिक अत्याचार केले! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची डॉक्टरांसमोर कबुली

Published Sep 21, 2024 09:58 AM IST

Badlapur Case : बदलापूर येथील नामवंत शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेने त्यानेच मुलींवर अत्याहार केल्याची कबुली दिली आहे.

मीच मुलींवर लैंगिक अत्याचार केले! आरोपी अक्षय शिंदेने डॉक्टरांसमोर दिली कबुली, आरोपपत्रात उघड
मीच मुलींवर लैंगिक अत्याचार केले! आरोपी अक्षय शिंदेने डॉक्टरांसमोर दिली कबुली, आरोपपत्रात उघड

Badlapur Case : बदलापूर येथे एका नामवंत शाळेत दोन मुलींवर शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे मोठा जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला या प्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असून या प्रकरणी आरोप पत्र देखील दाखल केले आहे. दरम्यान आरोपी अक्षय शिंदेने डॉक्टरांपुढे वैद्यकीय तपासणी दरम्यान, त्याने मुलींनवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा उल्लेख आरोप पत्रात करण्यात आला आहे.

बदलापूरमधील एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनवर अत्याचार करण्यात आले होते. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. ही घटना घडल्यानंतर पालकांनी या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यास गेले होते. तसेच शाळा प्रशासनावर देखील कारवाई ची मागणी केली होती. मात्र, त्यांनी तक्रार नोंदण्यास उशीर केला व पालकांना बसून ठेवल्याने दुसऱ्या दिवशी बदलापूर येथे पालकांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले होते. यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर काही नागरिकांनी या घटनेविरोधात आंदोलन करत आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. या वेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर या प्रकरणी चौकशी समिति स्थानप करण्यात आली होती.

पोलिसांनी शाळेतील सफाई कर्मचारी व आरोपी अक्षय शिंदे याला या प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करतांना आरोपी अक्षय शिंदेने त्याने मुलींवर अत्याचार केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी ही बाब आरोप पात्रात मांडली आहे.

डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी यांच्यासह २० जणांची चौकशी समितीने साक्ष घेतली आहे. तसेच विशेष न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात अक्षय शिंदेने डॉक्टरांसमोर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

अक्षयच्या पहिल्या पत्नीने देखील जबाब दिला आहे. तर दुसऱ्या पत्नीनेही अक्षय अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करून छळ करत असल्याचं म्हटलं आहे. अक्षयच्या या विकृतीमुळे ती माहेरी गेली असल्याचं तिने जबाबात सांगितलं आहे. या प्रकरणी तब्बल पृष्ठसंख्या ५०० पेक्षा अधिक कागद पत्रांचे आरोप पत्र सादर करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर