बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर…; सुषमा अंधारे यांचा उपरोधिक सवाल-badlapur school crime sushma andhare said if accused was akbar shaikh or khan then what ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर…; सुषमा अंधारे यांचा उपरोधिक सवाल

बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर…; सुषमा अंधारे यांचा उपरोधिक सवाल

Aug 21, 2024 05:12 PM IST

Sushma andhare On badlapur : सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात जर आरोपीचं नाव अकबर शेख,खान असतं तर?असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे यांचा बदलापूर घटनेवरून सत्ताधाऱ्यांना टोला
सुषमा अंधारे यांचा बदलापूर घटनेवरून सत्ताधाऱ्यांना टोला

Badlapur Crime : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी पालकांना १२ तास ताटकळत ठेवल्याचे समोर आल्यानंतर बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झाला. जमावाने शाळेची तोडफोड करुन आपला मोर्चा बदलापूर रेल्वेस्थानकाकडे वळवत रेले रोको आंदोलन केलं.

बदलापूरमध्ये मंगळवारी जनक्षोभ उसळला होता.  या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारीच अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे यांनी ही शाळा भाजपाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनीही एक प्रश्न उपस्थित केला आहे.

बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही मुली ४ वर्षे वयोगटातील आहेत. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं असून तो कवळ १५ दिवसापूर्वीच कामावर रुजू झाला होता. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे, तसेच आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत बदलापूरकर आक्रमक झाले होते. त्यातच आता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात जर आरोपीचं नाव अकबर, शेख, खान असतं तर? असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांमधील साडे सात वर्षे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. ज्या पालकांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? तो वामन म्हात्रे महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता? यानंतरही अपेक्षा करता की लोकांनी शांत बसावं? असे प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारले आहेत.

त्याचबरोबर जर बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आली असती? पोलीस आयुक्तांना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले? पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंचं काय करणार? असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत.