Badlapur Case: ‘बदला’पूर प्रकरण संपलं..! लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर-badlapur school crime case accused akshay shinde shot himself with police gun one police injured ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Badlapur Case: ‘बदला’पूर प्रकरण संपलं..! लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर

Badlapur Case: ‘बदला’पूर प्रकरण संपलं..! लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर

Sep 23, 2024 09:41 PM IST

Badlapur school crime case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसाच्या गोळीबाराच त्याचा मृत्यू झाला आहे.

आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न
आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र आता अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याचे समोर येत आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

ट्रान्झिट रिमांडसाठी  घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून  गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला. 

बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचार प्रकरणाआधी अक्षय शिंदे याच्यावर अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. बदलापूर प्रकरणात न्यायालयीन कोठडीतून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदुक हिसकाऊन घेतली आणि तीन गोळ्या झाडल्या. तळोजा तुरुंगातून त्याला बाहेर आणत असताना हा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला.

कोण होता अक्षय शिंदे?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील एका गावातील आहे. मात्र त्याचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपले आई-वडील,  भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. अक्षय शिंदे केवळ २४ वर्षांचा असून त्याची तीन लग्ने झाली आहेत. मात्र त्याच्या विक्षिप्त वागण्यामुळे तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या असून तो आई-वडील व भावाच्या कुटूंबासोबत रहात होता. अक्षयने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला बदलापूरच्या आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. 

आरोपी अक्षय शिंदे याने बदलापुरातील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. ही घटना १३ आणि १४ ऑगस्ट रोजी घडल्या आहेत. याच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी ऑगस्ट रोजी बदलापूर बंद आंदोलन करत शाळेची तोडफोड केली तसेच रेल्वे रोको आंदोलनही केले होते. लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते,  जमावाने त्यांच्याही घराची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. 

Whats_app_banner
विभाग