बदलापूरचा २४ वर्षीय नराधम अक्षय शिंदे याची झाली होती ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बदलापूरचा २४ वर्षीय नराधम अक्षय शिंदे याची झाली होती ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं!

बदलापूरचा २४ वर्षीय नराधम अक्षय शिंदे याची झाली होती ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं!

Aug 22, 2024 08:01 AM IST

Badlapur Case : बदलापूर घटनेतील आरोपीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याचे तीन लग्न झाले असून तिन्ही बायका सोडून गेल्याची माहिती आहे.

धक्कादायक! बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचे २४ व्या वर्षात झाले ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं
धक्कादायक! बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचे २४ व्या वर्षात झाले ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं

Badlapur Case accused Akshay shinde : बदलापूर शाळेतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. या प्रकाणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या मुखई येथील घराची काही नागरिकांनी तोडफोड केली. या सोबतच अक्षयची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपीचे २४ व्या वर्षांपर्यंत ३ लग्न झाले असून तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती आहे.

बदलापूरमधील येथिले एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. त्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आंदोलन करत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आरोपीची झाली होती तीन लग्न

आरोपी अक्षय शिंदे हा मूळचा कर्नाटक येथील आहे. त्याचा जन्म बदलापूर येथील मुखई गावात झाला आहे. आरोपी हा २४ वर्षांचा असून त्याचे २४ वर्षांतच तीन लग्न झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षय दहवीपर्यंत शिकला असून तो बदलापूरच्या शाळेत शिपाई व स्वच्छता कामगार म्हणून काम करत होता. अक्षयच्या कुटुंबात आई वडील भाऊ आणि भावाची बायको असून हे सर्व जण गावसोडून गेले आहेत.

ग्रामस्थांनी केली घराची तोडफोड

काल रात्री अक्षय शिंदे या आरोपीच्या मुखई येथील घराची तोडफोड गावातील काही ग्रामस्थांनी केली आहे. त्याच्या घराशेजारी नातेवाईकांच्या घरात देखील तोडफोड झाल्याचे वृत्त आहे.

आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

आरोपी अक्षयला कल्याण कोर्टापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला २६ ऑगस्ट पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. ही प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाणार आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली आहे. ते हा खटला चालवणार आहेत. दरम्यान, महावीकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर