Badlapur case: बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार, बदलापूर प्रकरणातील मुलींवर १५ दिवसांत अनेकदा अत्याचार झाल्याचं उघडं झालं आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झल्याचं उघडक झालं आहे. शाळा प्रशासनाने तब्बल ४८ तास तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या धक्कादायक निष्कर्षामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेबाबत आणि एकूणच शाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बदलापूर येथील घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सरकारवर सडकून टीका केली. तसेच ठीक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन देखील केले जात आहेत. अशावेळी समितीचा अहवालात करण्यात आलेल्या धक्कादायक निष्कर्षामुळे या घटनेची तीव्रता आणखी वाढली आहे.
चौकशी समितीच्या अहवालात अनेक निष्कर्ष पुढे आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला मोठी इजा झाली आहे. या मुलींवर पंधरा दिवसांत अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. १ ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता त्याला कामावर ठेवण्यात आले. तसेच ओलखपत्राशिवाय त्याला शाळेच्या आवारात प्रवेश होता. त्याची नियुक्ती त्रयस्त एजन्सीद्वारे का केली गेली, असे अनेक प्रश्न अहवालात उपस्थित करण्यात आले आहेत.
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी एसआयटीने अनेकांची चौकशी केली आहे. शाळेचे शिक्षक, सफाई कर्मचारी, लिपिकांचा यात समावेश आहे. जबाब नोंदवण्यात आलेल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून तिघांचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. शाळेच्या मुख्यध्यापिका व दोन विश्वस्त यात असून या बाबत लिपीक यांना माहिती मिळाली होती. ही बाब त्यांनी मुख्यध्यापिकांना सांगितली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी कारवाई केली नाही.
बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हे आंदोलन तब्बल १० तास चाललं.