firing at badlapur railway station : बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरणात ताजे असतानाच आता बदलापूर रेल्वे स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी गोळीबाराचा थरार लोकांनी अनुभवला. बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांची पळापळ झाली.
बदलापूर (badlapur news) रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीनेगोळीबारकेला.एकाव्यक्तीनेरेल्वे स्थानकातच गर्दीच्या वेळेसदोन जणांवरगोळीबार केला. दोन ते तीन राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात कोणी जखमी झाले आहे की नाही हे अद्यापही स्पष्ट नसले तरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.हल्लेखोराने गोळीबार करून तरुणावरतीक्ष्ण हत्यारांनीवार केल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या महिन्यात २० ऑगस्ट रोजी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांना बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं होतं. नागरिकांना ८ ते १० तास रेल्वे रोखून धरले होते. त्यांनी बदलापूर स्टेशनवर येऊन संपूर्ण दिवस रेल्वे सेवा ठप्प केली होती. सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाल पांगवलं व रेल्वे मार्ग मोकळा केला.
स्थानकात आलेल्या एका व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्याची माहिती आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
एका व्यक्तीने बदलापूर रेल्वे स्थानकात दोघांवर गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. या तरुणाने गोळीबार केल्यानंतर एक पांढरा शर्ट घातलेला तरुण घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. गोळीबारानंतर दोन तरुण होमप्लॅटफॉर्मवरून रोडवर पळ काढताना दिसत आहेत. तरुणाने गोळीबार केल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच पळापळ झाल्याचे दिसते. याच वेळी पोलीस देखील प्लॅटफॉर्मवर धाव घेताना दिसत आहेत.