Badlapur Crime : बदलापूर पूर्व मधील एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. बदलापूरकर नागरिकांनी या घटनेच्या विरोधात रेल रोको आंदोलन करून आपल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसलळी असताना बलात्काराच्या घटनेने बदलापूर पुन्हा हादरलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक करण्यात आले आहे.
तरुणीला तिच्या मैत्रिणीने गुंगीचे औषध दिले होते. तिला अटक करण्यात आले आहे. तसेच साताऱ्याहून आलेला शिवम राजे (वय २२) आणि संतोष रुपवते (वय ४०) या तरुणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
पीडिता आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी या २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्या ओळखीच्या दोन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता बदलापूर पूर्व भागात राहते. तसेच काही दिवसापूर्वी तिची ओळख शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिकाया तरुणीशी झाली होती. दोन दिवसांपूर्वी भूमिकाचा वाढदिवस होता. यानिमित्त तिने पीडित तरुण तसेच आपल्या काही मित्रांना पार्टीसाठी बोलावले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती.
पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. ड्रिंक्स प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. तिच्या त्या अवस्थेतच तरुणीच्या घरी एका तिच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला. रात्रभर मुलगी घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पालकांनी तरुणीशी संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी दारू पिऊन पडल्याने त्यांनी सांगितले. पालकांनी तिला आपल्या घरी आणलं. घरी परतल्यानंतर तरुणीला शुद्ध आली व रात्री आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी असता तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र तिच्यावर एकाने बलात्कार केला की दोन तरुणांनी हे स्पष्ट झालेले नाही.